पट्टेदार वाघ शिरला जोगीनगुंफा गावात

गावकर्यांनी लावला पळवून

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर, 
striped-tiger : शिवणफळ जंगलालगत असलेल्या जोगीनगुंफा गावात शनिवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ थेट गावात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील एका घराच्या आडोश्याला वाघ दिसताच नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघाने गावातून माघार घेत जंगलाच्या दिशेने धाव घेतली.
 
 
 
TIGER
 
 
जोगीनगुंफा परिसरात वाघांचे दर्शन आता नित्याचे झाले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. विशेषतः सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगत आहेत. शिवणफळ जंगल परिसरात दोन पट्टेदार वाघ, पिल्लांसह एक वाघीण असा एकूण पाच ते सहा वाघांचा वावर आहे. ताडगाव, कोरा, पिंपळगाव, शिवणफळ आणि जोगीनगुंफा परिसरात या वाघांचा नियमित संचार आहे.
 
यापूर्वी रासा गावात अस्वल घरात शिरल्याची घटना घडली होती. वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.