आर्वी,
liquor-smuggler-nabbed : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विदेशी मद्याची तस्करी करणार्यांवर आर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर ठेवत सिनेस्टाईल धाडसी कारवाई केली. सावळापूर घाटात थरारक पाठलाग करून दोन ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावत संशयित वाहनाला अडविण्यात आले. या कारवाईत विविध ब्रँडच्या ३० पेट्या विदेशी दारूसह दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख वसीम शेख सत्तार आणि शेख वसीम अब्दुल सत्तार दोन्ही रा. वर्धा हे सालबर्डी येथून वर्धेकडे विदेशी दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी सापळा रचला. मात्र आरोपींनी वाहन न थांबवता पळ काढल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. अखेर सावळापूर घाटात दोन ट्रॅक्टर आडवे लावून वाहनाचा मार्ग अडवत आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात महेश राठोड, गजानन वडनेरकर, अमित जुवारे, निलेश करडे, भूषण इखार आणि प्रवीण बंडवाल यांनी संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.