अनालॉग पनीरची सूचना बंधनकारक

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
- अन्न व औषध प्रशासनाची नोटीस

नागपूर, 
Food and Drug Administration विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना स्पष्ट निर्देश दिले होते की, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे पनीर व चीज हे दुधापासून तयार केलेले आहे किंवा अनालॉग प्रकारचे याबाबतची माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठळक ठिकाणी फलकाद्वारे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
 

panir 
मात्र, वर्धा रोडवरील थ्री-स्टार हॉटेल ली मेरिडियन येथे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान हा आवश्यक फलक आढळून आला नाही. व्हीआयपी पाहुण्यांची वदर्ळ असलेल्या या हॉटेलमध्ये ग्राहकांना आवश्यक माहिती देणारा कोणताही फलक नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. अर्चना खंडारे यांच्या निदर्शनास आले. यानंतर डॉ. खंडारे यांनी हॉटेलच्या व्यवस्थापकाला तत्काळ आवश्यक सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट ताकीदही देण्यात आली.
ग्राहकांना ते कोणते अन्नपदार्थ सेवन करीत आहेत याची अचूक माहिती मिळावी म्हणून असा पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, शहरातील विविध हॉटेल्समध्ये अशा तपासण्या पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.