घरातून काम करण्याचे आवाहन
मॉस्को,
russia after ukraine invasion रशियाच्या नोवोसिबिर्स्क प्रांतातील प्रशासनाने रहिवाशांना घरातून काम करण्यास आणि वाहनांचा वापर कमी करण्यास सांगितले आहे. युक्रेनच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवरील हल्ल्यांमुळे या प्रदेशातील इंधन संकट अधिक गडद झाले आहे. सुमारे 30 लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश सायबेरियातील सर्वात मोठ्या प्रदेशांपैकी एक आणि एक प्रमुख आर्थिक व उत्पादन केंद्र आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला युक्रेनने ओम्स्कमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला करून देशातील सर्वात मोठ्या तेल प्रक्रिया केंद्रांपैकी एक बंद पाडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. नोवोसिबिर्स्क सरकारने कंपन्यांना ‘कर्मचाèयांना घरातून काम करण्यास सांगावे आणि इंधनाचा वापर कमी करावा‘ असा सल्ला दिला आहे. युक्रेनने साडेचार वर्षांच्या युद्धादरम्यान रशियाच्या तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे आणि हे हल्ले आपल्या नागरिकांवरील हल्ल्यांचा बदला असल्याचा दावा केला आहे.