
gen-z nepal बेरोजगारीच्या आघाडीवरील अपयशामुळे पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. काठमांडूमध्ये तरुण निदर्शने करत आहेत, तर संसदेत विरोधकांनी सरकारला घेरले आहे. मुख्य विरोधी पक्ष नेपाली काँग्रेसचा आरोप आहे की, बालेन सरकार तरुणांमध्ये आशा व विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. उपसभापती विश्वप्रकाश शर्मा यांनीही आत्मदहनाच्या घटनांना राज्याप्रती वाढत्या निराशेचे प्रतीक म्हटले आहे. ते म्हणाले, सध्याच्या सरकारमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे, जेन-झी नेते मिराज ढुंगाना म्हणाले, आत्मदहनाच्या घटना सरकारविरोधाचे संकेत आहेत. पंतप्रधान बालेन शाह आश्नासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचे दिलेले वचन ते पूर्ण करू शकले नाही, पर्यायाने त्यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली असून, तरुणाईला आंदोलनाचा मार्ग निवडाला लागला.
देशव्यापी आंदोलनाचा इशारा
gen-z nepal ‘जेन-झी नेपाळ’ या संघटनेने बालेन यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने काम केल्याचा आरोप केला. संघटनेनुसार, सरकारने सुकुम्बासी भागातील घरांवर बुलडोझर चालवला व यंत्रणेचा गैरवापर केला. बजेट व धोरणांत तरुणांच्या रोजगार व उत्पन्न वाढीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. सरकारने धोरणात बदल न केल्यास त्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.gen-z nepal आंदोलनात सहभागी झालेल्या तीन तरुणांनी आत्मदहन केले, त्यात दोघांचा मृत्यू झाला. गणेश नावाच्या तरुणाने पोलिसांसोबत झालेल्या दंडाच्या वादातून स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे व्यवसायासाठी कर्ज न मिळाल्याचा आरोप करत एका तरुणाने पेट्रोल ओतून आत्मदहन केले. विवेक मंडल या तरुणाने बेरोजगारीमुळे हताश होऊन रविवारी स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावली, यात तो गंभीर जखमी झाला. विशेष असे की, यापूर्वी नेपाळमध्ये झालेल्या जेन झी च्या आंदोलनाचे नेतृत्व काठमांडूचे तत्कालीन महापौर बालेन यांनी केले होते. आता त्यांच्याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.