जस्मिन सँडलसची 'रिंग सेरेमनी' जाहीर

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
asmine sandlas प्रसिद्ध पंजाबी गायिका जस्मिन सँडलसने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शनिवारी, ११ जुलै २०२६ रोजी दिल्लीत झालेल्या 'द ड्रीम गर्ल इंडिया टूर'च्या उद्घाटन कार्यक्रमात तिने आपला साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा केली. स्टेजवरच तिने साखरपुड्याची अंगठी दाखवत होणारे पती शेखर चौधरी यांची चाहत्यांशी ओळख करून दिली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याची मोठी चर्चा रंगली आहे.
 
asmine sandlas
 
'धुरंधर' चित्रपटातील 'शरत' या गाण्यामुळे विशेष लोकप्रिय ठरलेल्या जस्मिनने कार्यक्रमादरम्यान शेखर चौधरी यांचा हात हातात घेत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. "याच व्यक्तीने माझ्या बोटात साखरपुड्याची अंगठी घातली आहे. मित्रांनो, हा माझा माणूस आहे," असे म्हणत तिने आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ती आनंदाने शेखर यांच्याकडे धावत गेली आणि त्यांना मिठी मारली. या घोषणेनंतर उपस्थित चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर जस्मिन सँडलसचा होणारा पती शेखर चौधरी नेमके कोण आहेत, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये अधिकच वाढली आहे.