करण जोहरचा टॉवेल डान्स ठरला चर्चेचा विषय!

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
मुंबई,
karan johars towel dance अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि दिग्दर्शक शरण शर्मा यांच्या लग्नापूर्वीच्या संगीत सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सेलिब्रिटींच्या धमाकेदार उपस्थितीने या सोहळ्याला विशेष रंगत आली. आलिया भट्टनंतर आता करण जोहर आणि जान्हवी कपूर यांच्या नृत्याचा व्हिडिओही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

karan johars towel dance
मुंबईत शुक्रवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या संगीत समारंभात करण जोहरने मंचावर येत आपल्या खास शैलीत सर्वांचे मनोरंजन केले. जान्हवी कपूरसोबत त्याने 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील लोकप्रिय 'शवा शवा' या गाण्यावर रंगतदार नृत्य सादर केले. त्यानंतर सलमान खानच्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटातील 'जीने के हैं चार दिन' या गाण्यावर हातात टॉवेल घेऊन केलेल्या त्याच्या नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. या दोन्ही सादरीकरणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
 
आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट निर्माता शरण शर्मा यांनी ११ जुलै रोजी विवाहबंधनात अडकत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांनी आपले नाते कायमच खासगी ठेवले होते. त्यांचा विवाह जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वागत समारंभात चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी हजेरी लावली.
दरम्यान, आकांक्षा रंजन कपूरने अभिनय क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे. ती नुकतीच सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित नेटफ्लिक्सवरील 'इक्का' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात अक्षय खन्ना, सनी देओल, दिया मिर्झा आणि तिलोत्तमा शोम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तसेच ती 'ग्राम चिकित्सालय'च्या दुसऱ्या पर्वातही दिसली असून ही मालिका प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.