नवी दिल्ली
hormuz होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जीएफएक्स गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य ओमानच्या सागरी क्षेत्रात हे ड्रोन हल्ले झाले. या जहाजावर एकूण 11 भारतीय नागरिक कार्यरत होते. हल्ल्यानंतर तातडीने राबवलेल्या मोहिमेत १० भारतीय कर्मचाèयांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले असले, तरीही एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. यापूर्वी इराणने ओमानच्या क्षेत्रातील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता, परंतु ओमानच्या प्रशासनाने (सल्तनत) हा दावा अधिकृतपणे मान्य केलेला नाही.
परराष्ट्र मंत्रालयाचा तीव्र निषेध
hormuz ओमानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या या हिंसक हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, बेपत्ता असलेल्या एका भारतीय कर्मचाèयाचा शोध घेण्यासाठी आणि बचाव मोहिमेसाठी भारतीय प्रशासन ओमानच्या सुरक्षा अधिकाèयांशी अत्यंत जवळून काम करत आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याबद्दल भारताने त्यांचे आभार मानले आहेत.
हल्ले रोखण्याचे भारताचे आवाहन
hormuz परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात पुढे नमूद केले आहे की, या सागरी क्षेत्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जाण्याचे वाढते प्रकार ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आंतरराष्ट—ीय कायद्यानुसार सागरी व्यापार आणि जहाजांची ये-जा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षितपणे सुरू राहणे आवश्यक आहे. या भागातील नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले त्वरित थांबवून, सर्व संबंधित देशांनी राजनैतिक वाटाघाटींद्वारे तणाव कमी करावा आणि मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन भारताने केले आहे.
अमेरिकेचे इराणच्या 140 ठिकाणांवर हल्ले
hormuz या ताज्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील लष्करी तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकन लष्कराने जमीन, समुद्र आणि हवेतून लढाऊ विमाने, ड्रोन आणि नौदलाच्या जहाजांद्वारे अचूक मारा करणाèया शस्त्रांचा वापर करत इराणच्या तब्बल 140 लष्करी तळांवर भीषण हल्ले चढवले आहेत. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.
संयुक्त अरब अमिरातीने जारी केला अलर्ट
hormuz इराणच्या प्रतिहल्ल्यानंतर शेजारील देश कतारमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्याच्या लगेचच नंतर संपूर्ण कतारमध्ये क्षेपणास्त्र धोक्याचे सायरन वाजू लागले. कतारच्या लष्कराने नंतर अधिकृतपणे स्पष्ट केले की, त्यांनी इराणच्या दिशेने आलेली क्षेपणास्त्रे हवेतच यशस्वीपणे पाडली आहेत. या वाढत्या संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातीने (णअए) आपल्या संपूर्ण क्षेत्रात संभाव्य क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा इशारा जारी केला आहे.