शहरात युवा पिढीला बरबाद करणाऱ्या एमडीसह एका तस्कराला अटक

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर, 
MD smuggler arrested शहरात गुन्हे शाखेचे एनडीपीएस पथक गांभीर्याने कर्तव्य बजावत नसल्यामुळे ड्रग्ज तस्करी आणि विक्री वाढली आहे. ड्रग्ज विक्री बिनधास्त सुरु आहे. यशोधरानगरात एका ड्रग्ज तस्कराला एमडीसह पोलिसांनी अटक केली. या कारवाईवरुन ‘ऑपरेशन थंडर’ या नावाने अभियान राबविल्याचा दावा फोल ठरला आहे.
 
arrested
 
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्या कार्यकाळात ‘ऑपरेशन थंडर’ नावाने अभियान राबवूव ड्रग्ज तस्करी आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्याचा बडेजाव केला. या अभियानानंतर शहरात ड्रग्ज विक्री थांबणार असा दावा करण्यात आला. मात्र, आतापर्यंत ड्रग्जविक्री सुरुच असल्यामुळे तत्कालिन आयुक्तांना सपशेल अपयश आल्याचे समोर आले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास यशोधरानगर पोलिसांनी विटाभट्टी चौकात आरोपी इरफान अमजद खान (पवननगर, शिवाजी चौक) हा दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी बघताच तो पळायला लागला. पोलिसांनी पाठलाग केला आणि त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता २७ ग्रॅम एमडी मिळून आले. त्याच्याकडून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याला खाक्या दाखवताच त्याने साथिदार रेहान नईम सय्यद (इंदिरामाता चौक) याचे नाव सांगितले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून इरफानला अटक केली आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी कनेक्शन असल्यामुळेच शहरात एमडी विक्री सुरु असल्याची चर्चा आहे.