पुलगावच्या हिंगणघाटफैलचा फैसला होणार

ना. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आ. बकाने यांची बैठक

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
rajesh-bakane : १२ जुलैपुलगाव शहरातील हिंगणघाट फैल परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या मालकी हक्काच्या प्रश्नासह घरं नियमानुकूल करण्याच्या विषयावर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आ. राजेश बकाने यांनी हिंगणघाटफैलचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी केली.
 
 
 
J
 
 
बैठकीला अॅड. दिनेश शर्मा, अशोक पणपालिया, महसूल विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी वान्मथी सी. या आभासी बैठकीत सहभागी झाल्या.
 
 
यावेळी आ. राजेश बकाने यांनी हिंगणघाट फैल परिसरातील हक्काची कागदपत्रे नसल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, बँक कर्ज, घरबांधणी, मालमत्ता हस्तांतरण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसुली नोंदी, उपलब्ध कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींचा आढावा बैठकीत मांडला.
 
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या तसेच नियमानुसार मालकी हक्क प्रदान करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतिमान करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.