सार्वजनिक वाचनालय परिसरातील ओपन जिमचे लोकार्पण उत्साहात

आ. श्याम खोडे यांच्या विशेष निधीतून उभारणी

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
shyam-khode : शहरातील स्व. वसंतराव नाईक सार्वजनिक वाचनालय परिसरात आमदार श्याम खोडे यांच्या विशेष सहकार्य निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण आज, १२ जुलै रोजी आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 

shyam-khodeJK
 
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. श्याम खोडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अशोक परळीकर, सुरेश लुंगे, सुनील मालपाणी, गटनेते गणेश खोडे, वीरेंद्रसिंह ठाकूर, प्रा. नंदलाल पवार, शहराध्यक्ष अभिषेक दंडे, नगरसेवक सुधीर घोडचर, गणेश बजाज, अ‍ॅड.राजेश्वर पांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार श्याम खोडे म्हणाले की, या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रगतीमध्ये वाचनालयाचे सचिव बी. पी. पवार यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, व्यायामाची सवय वाढावी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने सार्वजनिक वाचनालय परिसरात ओपन जिमची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही शुल्क न भरता घेता येणार असून, शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन ही सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक प्रा. नंदलाल पवार म्हणाले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असताना विविध लोकप्रतिनिधींची विकासकामे जवळून पाहण्याची संधी मिळाली. मात्र, अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावणारे आमदार श्याम खोडे हे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या हितासाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम ते सातत्याने राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
नगराध्यक्ष अशोक परळीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वाशीम-मंगरूळनाथ मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली असून, सार्वजनिक सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. शहरातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी ओपन जिमचा नियमित वापर करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश संगत, बाळू दिवेकर, मो. शारीक, गोपाल शिंदे, बाळासाहेब घोडचर, अजहर मो. शफी, विजय भोजने, गोपाल क्षीरसागर, गोपाल वर्मा, शंकर थोरात, सचिन पवार, उमेश भोजने, शेख नावेद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद घोडचर यांनी केले. तर गोविंद राठोड यांनी आभार मानले.