चार कोटी नामजपाची ऐतिहासिक पूर्ती

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Sadguru Prahlad Maharaj सद्गुरू प्रल्हाद महाराज शंकरनगर उपासना केंद्रातर्फे वर्षभर सुरू असलेल्या अखंड नामसंकीर्तन संकल्पाची चार कोटी 'श्री राम जय राम जय जय राम' नामजप पूर्ण करून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.यावेळी हभप श्री रामदासाचार्य जालनेकर यांनी मार्गदर्शन करताना युवक-युवतींच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
 
 
 
jok
 
 
समारोपानिमित्त आयोजित 'हरी हाट' उपक्रमात सामूहिक नामजप, हरिपाठ, विष्णुसहस्रनाम, रामरक्षा, हनुमान चालीसा, मनाचे श्लोक व दासबोध पठण करण्यात आले.Sadguru Prahlad Maharaj संपूर्ण परिसर भक्तिरसाने दुमदुमून गेला.श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या पवित्र चरणपादुकांचे दर्शन भाविकांना लाभले. महाप्रसाद व अन्नदानाने सोहळ्याची सांगता झाली.
सौजन्य :महेश मोळकर,संपर्क मित्र