मुंबई,
set-exam-postponed : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि आषघढी वारीच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली 41 वी सेट परीक्षा आता 6 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठे तसेच वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करणारी सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठातर्फे आयोजित केली जाते. विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा राज्य सरकारची नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असून यूजीसी मार्गदर्शक तत्वांनुसार ही परीक्षा घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. यंदाची 41 वी सेट परीक्षा 26 जुलै रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विषयांच्या भरतीसाठीच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन्हींपैकी एकाच परीक्षेला उपस्थित राहता येणार होते.
या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाèयांना दिलासा मिळाला आहे.