मानोरा,
tree-plantation-drive : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा सप्ताहानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत गिरोली येथील मंदिर परिसर तसेच मोक्षधाम परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ व हरित परिसराची निर्मिती आणि वृक्षसंवर्धनाबाबत समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. तसेच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. दरवर्षी सेवा सप्ताहानिमित्त अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून संघटना सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदचे करन ठाकुर, डॉ. अविनाश लोथे, मनोज डाबरे, सचिन पडघान, आदेश अडावे, मयुर देशमुख, विजय शिंदे, कैलाश वावडे, गौरव देशमुख, राज चव्हाण, संकेत उगले, गणेश इंगोले, वेदांत वजीर, साहिल लेखूरवाड, नमन जाधव, हर्षद राठोड, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.