विनोबांच्या गीताई दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    दिनांक :12-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
vinobas-gitai-dindi : शहरा लगतच्या साटोडा येथील निवेदिता निलयम युवा केंद्रातून आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तीन दशकांपासून पवनार ते पंढरपूर वारी विनोबांच्या या गीताई दिंडीची आजही कायम आहे.
 
 
WARDHA
 
या वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी आळंदी-पंढरपूर मार्गावर सहभागी होतात. या लाखो वारकर्‍यांपर्यंत आचार्य विनोबा भावे यांचे अनमोल साहित्यरत्न गीताई तसेच गीता प्रवचन या ग्रंथाचा प्रचार व प्रसार व्हावा, वारकरी संप्रदायातील भतिभाव आणि सर्वोदयाच्या विचार घेऊन गीताई दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी भाविनी पारेख, पवनार आश्रमच्या दयाताई, दिल्लीचे सत्यप्रकाश भारत, सेवाग्राम आश्रमचे जालंदरनाथ, मयूर महाराज, संजय पालीवाल, श्याम जवदंड, नाना चौधरी, गजानन ठाकरे, दामोदर उघडे, सोहम पंड्या, संदेश राऊत, गिरीश भोगे, आशा डफळे, रेखा राऊत, सोनाली फाटे, केतन किटे, सुनील ओरके, सुरेश चोपडे आदींची उपस्थिती होती.
 
गीताई वारी तिशीत
 
 
गीताई दिंडीचे यावर्षीचे तिसावे वर्ष आहे. तीन दशकांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाद्वारे आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रसार केला जात आहे. विनोबांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीत सर्वोदय मंडळी पवनार आश्रमातून सन १९७६ पासून नियमितपणे आषाढी वारीसाठी जात होती. या अर्थाने सर्वोदय विचारातील दिंडीचे हे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.