यवतमाळ,
Amolakchand College अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ रसायनशास्त्र विभागातील वैभवी गोडे, आचल पवार, तेजस बेले या विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. अमृत गुणवंत गड्डमवार व डॉ. ओमकार कापसे यांच्या मार्गदर्शनात संशोधनातून भारतीय भौतिक संपदा हक्क प्राप्त केले आहे.
वरील तिन्ही विद्यार्थी अमोलकचंद महाविद्यालय रसायनशास्त्र विभागात सत्र 2024 ते 2025 मध्ये रसायनशास्त्र या विषयात एमएस्सी करीत होते. आपले प्रकल्प डॉ. अमृत गुणवंत गड्डमवार यांच्या मार्गदर्शनात करीत होते. त्यांनी आपल्या प्रकल्प आधारित संशोधनात सखोल अभ्यास करून त्या विषयाला अनुसरून भारतीय बौद्धिक संपदा हक्कासाठी बौद्धिक संपदा हक्क भवन मुंबई येथे प्रस्तावीत केले होते. त्यांना यावर्षी म्हणजेच जून 2026 मध्ये भारतीय बौद्धिक संपदा हक्क प्रदान करण्यात आले.
त्यांच्या संशोधनाचा विषय ‘कॅबिनेट ऑफ इलेक्ट्रोड फॉर इलेक्ट्रो केमिकल अॅनालिसीस’ असे होते. यात त्यांनी आतापर्यंत कुठलाही द्रावणाचे विश्लेषण करण्यासाठी द्रावणाचे प्रमाण जास्त लागत होते. द्रावणाचे प्रमाण निम्म्यावर आले असून जगात करोडो रुपयांचे द्रावण आपण वाचवू शकतो, हे या संशोधनातून सिद्ध झाले. द्रावणाचे विश्लेषण अचूक करण्यात मदत होते व एकाच वेळेत द्रावणाचे विश्लेषण पारखूनसुद्धा पाहता येते किंवा खात्रीसुद्धा एकाच वेळेला करता येते. याचा लाभ जगातील असंख्य केमिस्ट व प्रयोगशाळेत काम करणाèया संशोधकांना होणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा व सचिव सनदी लेखापाल प्रकाश चोपडा यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे कौतुक केले. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय लाड यांनी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. टीपी चव्हाण व विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.