वर्धा,
ATS Investigation गेल्या आठवड्यात पाकिस्तानी टोळीसोबत समाज माध्यमावरून सतत संपर्कात असलेल्या देवळी तालुक्यातील सरूळ येथील एकाला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता अनेक गोष्टींचा उलगडा झाला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. देवळी तालुक्यातील सरूळ येथील ४० वर्षीय इसमानाला एटीएसने अटक केली. त्यानंतर त्याचे नागपूरच्या कृष्णा यादवशी संबंध असल्याचे पुढे असुन जोधपूरच्या एका महिलेसोबतच्या दीर्घकालीन संपर्काचीही चौकशी केली जात आहे.
पाकिस्तानातील कुख्यात गुंड शहजाद भट्टीसोबतच्या कथित संबंधांबाबत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघड झाले आहेत. नागपूर येथील कृष्णा यादवचा शहजाद भट्टी गँगसोबत संपर्क असल्याचा संशय पोलिसांना आहे. या तपासात राजस्थानच्या जोधपूर येथील एका महिलेच्या रूपाने आणखी एक महत्त्वाचा दुवा पुढे आला असुन सरूळ येथील इसम बर्याच काळापासून त्या महिलेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.