दुचाकीसह ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट,
Battery thief caught स्थानिक पोलिसांनी दाखल बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून एकास अटक केली. चोरट्याकडून चोरीच्या तीन बॅटर्या व दुचाकी असा ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अंकीत मोगरे रा. स्विपर कॉलनी, हिंगणघाट असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी इंद्रजीत शाहु, जगदीश कांबळे आणि सतीश वरटकर यांच्या मालकीच्या ट्रक्टरच्या बॅटर्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अंकीत मोगरे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या तीन बॅटर्या व एक दुचाकी असा ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनिल राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल थूल, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहीत साठे यांनी केली.