बेसा परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव नागरिक त्रस्त

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Besa, Nagpurशहरालगतच्या बेसा परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. साचलेले पावसाचे पाणी, नाल्यांची अपुरी स्वच्छता, वाढलेली झुडपे आणि रिकाम्या भूखंडांमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 

das 
 
 
डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नियमित फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, नाले व गटारांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि रिकाम्या प्लॉटची साफसफाई तातडीने करण्यात यावी, Besa, Nagpurअशी मागणी नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे. तसेच आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवून डासांच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
सौजन्य:वीरेंद्र जोगी ,संपर्क मित्र