भगवती कॉलेजमध्ये वृक्षदिंडी

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Bhagwati Girls' Junior College भगवती गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींनी 'झाडे लावा, झाडे जगवा', 'पर्यावरण वाचवा' आणि 'पाणी वाचवा' अशा घोषणांद्वारे जनजागृती केली. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून रोपांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.

dindi 
 
 
प्राचार्या वनिता बहुरूपी, पर्यवेक्षक अतुल दोनोडे, प्रमोद कराडे व प्रकाश गभने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.Bhagwati Girls' Junior College डॉ. दीपा हटवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रम यशस्वी ठरला.
सौजन्य:वीरेंद्र जोगी,संपर्क मित्र