पोलिस आयुक्तांकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर, 
City Police Force शहर पोलिस दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांचा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलिस भवन येथील सभागृहात आयोजित समारंभात प्रशस्तीपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला.
 
 
police 1
 
समारंभात लकडगंज येथील एका क्लिष्ट खून प्रकरणाची उकल करणाऱ्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ चे पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर आणि त्यांच्या पथकाला सन्मानित करण्यात आले. तसेच लॉग-इन पर्सनल मीटिंग अ‍ॅपद्वारे चालणारे आंतरराष्ट्रीय देहव्यवसाय रॅकेट उधळणारे आणि शस्त्रसाठा जप्त करणारे सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, प्रकाश माथनकर, राम निरगुडवार, शेषराव राऊत, अश्विन मांगे, समिर शेख, नितीन वासनिक, कुणाल मसराम, पूनम शेंडे, अश्विनी खोडपेवार यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच, एका व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करून सुरक्षित वाचवणारे खापरखेडा पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिश रुमकर आणि त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले. सन्मानित पोलिसांनी या सत्कारामुळे आम्हाला अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
 
 
police 2

शहर पोलिस दलातील प्रत्येक सदस्य माझा कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि प्रेरणादायी कार्याची आम्ही दखल घेऊ. अशा उपक्रमांमुळे कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते.
- विश्वास नांगरे-पाटील, (पोलिस आयुक्त, नागपूर)