शेतरस्त्याच्या वादातून महिलेसह चौघांना मारहाण

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
तिन जण गंभीर जखमी आठ जणांविरुद्ध गुन्हा
 
बुलढाणा, 
Deulghat assault case शेतातून ट्रॅटर नेण्याच्या वादातून एका महिला शेतकर्‍यासह तिच्या तिन्ही मुलांना मारहाण केल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट शिवारात घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, महिलेचा गळा दाबून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच गळ्यातील सुमारे दोन तोळे सोन्याची पोतही हिसकावून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
 
 
marhan dksl
 
आयेशा बेगम अब्दुल मजीद यांनी दिलेल्या फियार्दीवरून शेख गफार शेख गणी,शेक वकील शेख गणी, शेख सत्तार शेख गणी, शेख शहेजाद शेख गफार, शेख मुकीम शेख जैनू, शेख साहिल शेख वकील, शेख मुख्तार शेख गफार (सर्व रा. देऊळघाट) तसेच शेख मोईन शेख अयाज (रा. बुलढाणा) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक आशिष चेचेरे करीत आहे.