वडिलांच्या स्मृतीला वृक्षारोपणातून अभिवादन

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर , 
Environmental Conservation भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक झाड आईच्या नावाने' या अभियानातून प्रेरणा घेत सीपीडब्ल्यूडी कॉलनीत 'एक झाड बाऊजींच्या नावाने' वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन डीआरटी न्यायाधीश पंकज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्वर्गीय वडील सी.पी.एम. सिंह यांच्या स्मरणार्थ पीपळाचे रोप लावले. यावेळी त्यांचे सुपुत्र पीयूष कुमार यांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला.गृह कल्याण केंद्राचे क्षेत्र कल्याण अधिकारी विनय कुमार गुप्ता, सीपीडब्ल्यूडी उद्यान विभागाचे सहाय्यक संचालक के. के. चंद्राकर आणि STRIEAU च्या ग्रीन एंडेवर उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. सीपीडब्ल्यूडी कॉलनीतील मुलांनी व पालकांनी विविध फळझाडे आणि सावलीच्या वृक्षांची लागवड केली.
 

khop 
 
 
गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन एंडेवरच्या मार्गदर्शक योगिता खान यांचा यावेळी न्यायाधीश पंकज कुमार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.Environmental Conservation सहभागी मुलांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली तसेच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची शपथही देण्यात आली. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासोबतच आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती जपण्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
सौजन्य: सचिन खोब्रागडे ,संपर्क मित्र