फडणवीसांनी शरद पवारांना पछाडले!

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मारली बाजी

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
devendra fadanvis महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एका महत्त्वाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मागे टाकत राज्याच्या  इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या नव्या विक्रमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

fadanvis pawar 
 
devendra fadanvis १२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २४३० दिवसांचा, म्हणजेच सुमारे ६  वर्षे ७  महिन्यांचा झाला आहे. याच कालावधीमुळे त्यांनी शरद पवार यांच्या २४१२ दिवसांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू असल्याने हा आकडा आगामी काळात आणखी वाढणार आहे.
devendra fadanvis शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यांच्या कोणत्याही कार्यकाळाला पूर्ण पाच वर्षांचा कालावधी लाभला नाही. विविध राजकीय घडामोडी आणि बदलत्या सत्तासमीकरणांमुळे त्यांचे प्रत्येक कार्यकाळ वेगवेगळ्या टप्प्यांवर संपुष्टात आले.
devendra fadanvis दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ सलग पाच वर्षांचा होता आणि तो राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतरचा दुसरा कार्यकाळ अवघ्या सहा दिवसांचा ठरला. तर तिसरा कार्यकाळ सध्या सुरू असून,१२ जुलै २०२६ पर्यंत या कार्यकाळाला ५८५  दिवस पूर्ण झाले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये वसंतराव नाईक हे आजही अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी तब्बल ४०९६ दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख असून त्यांचा कार्यकाळ २६८६ दिवसांचा होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी २४३० दिवसांच्या कार्यकाळासह तिसरे स्थान पटकावत शरद पवार यांना चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.