अहेरी
ganja alapall गडचिरोली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अहेरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. आलापल्ली येथील बसस्थानकासमोरील एका पानटपरीवर टाकलेल्या छाप्यात 1.622 किलो गांजा आणि गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणार्या 40 मातीच्या चिलमींसह एकूण 32,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पानटपरी चालकाला रंगेहात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ganja alapall पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलापल्ली येथील बस स्टॉपसमोरील ‘गोपाल पान सेंटर अँड कोल्ड्रिंक्स’ या दुकानात बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अहेरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पूर्ण खातरजमा केल्यानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चुनीलाल पटले यांच्या नेतृत्वात पोलिसांनी रणनीती आखली. 12 जुलै रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 1.30 वाजताच्या दरम्यान या दुकानात नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानाची कसून झडती घेतली असता, पोलिसांना गांजा हिरवी पाने, फुले आणि बोंडे असलेला 32 हजार रुपये किंमतीचा 1.622 किलो गांजा व चिलमी गांजा पिण्यासाठी वापरल्या जाणार्या 400 रुपये किमतीच्या 40 नग मातीच्या चिलमी असा एकूण 32 हजार 400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ganja alapall आरोपी गोपाल नवकुमार बिश्वास (45) रा. बस स्टॉपसमोर, आलापल्ली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अहेरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, सपोनि देवेंद्र पटले यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मंगेश वळवी करीतत आहेत. अमली पदार्थ विक्रीच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.