अमेरिकन राजकारणात खळबळ

भारताला 500 टक्के टॅरिफची धमकी देणाऱ्या खासदाराचं निधन

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
lindsey graham passes away अमेरिकेचे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि दक्षिण कॅरोलिनाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचे अचानक निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या कार्यालयाने सोशल मीडियाद्वारे अधिकृत निवेदन जारी करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शनिवारी संध्याकाळी एका अल्पकालीन आणि अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली, असे या संक्षिप्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबत कार्यालयाकडून कोणताही सविस्तर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
 
lindsey graham passes away
 
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि सल्लागार
लिंडसे ग्रॅहम हे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2002 मध्ये त्यांची पहिल्यांदा अमेरिकन सिनेटवर निवड झाली होती. ट्रम्प यांच्या कार्यकाळात ग्रॅहम हे त्यांचे प्रमुख धोरणात्मक सल्लागार बनले. त्यांना अनेकदा ट्रम्प यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करताना आणि गोल्फ कोर्सवर वेळ घालवताना पाहिले जायचे. विशेषतः इराण आणि रशियासारख्या देशांशी संबंधित परराष्ट्रधोरण आखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. अगदी गेल्या शुक्रवारीच त्यांनी रशियावरील निर्बंध अधिक कडक करण्याच्या प्रशासनाच्या नव्या योजनेची घोषणा केली होती. तसेच त्यांनी भारताला 500 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती.
 
’खरा देशभक्त गमावला’; राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून शोक व्यक्त
आपले जवळचे मित्र आणि सहकारी लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, ‘सिनेटर लिंडसे ग्रॅहम हे माझ्या ओळखीतील सर्वोत्तम व्यक्ती आणि गुणवान सिनेटर्सपैकी एक होते. देशासाठी अथक परिश्रम करणारे ते एक खरे अमेरिकन देशभक्त होते. लिंडसे, तुमची उणीव नेहमीच भासत राहील.
 
इराणविरोधी आक्रमक परराष्ट्रधोरणाचे पुरस्कर्ते
परराष्ट्रधोरणाच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेण्यासाठी लिंडसे ग्रॅहम ओळखले जात असत. 1990 च्या दशकात अमेरिकन संसदेचे (काँग्रेस) सदस्य असल्यापासूनच त्यांनी इराणला जागतिक स्तरावर एकाकी पाडण्याच्या आणि त्यांचा अणु कार्यक्रम रोखण्याच्या धोरणांचे जोरदार समर्थन केले होते. गेल्या वर्षी इराणच्या अणु प्रकल्पांवर लष्करी हल्ला करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला त्यांनी उघड पाठिंबा दिला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी इराणसोबत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही त्यांनी अमेरिकेच्या आक्रमक लष्करी पवित्र्याचे समर्थन केले होते.
 
राष्ट्रध्यक्षपदाची उमेदवारी ते ट्रम्प यांचे मुख्य साथीदार
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लिंडसे ग्रॅहम यांनी 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट—ाध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याचा एक अल्पकाळ प्रयत्न केला होता. मात्र, या शर्यतीनंतर जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट—ाध्यक्ष बनले, तेव्हा ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या सर्वात विश्वासू आणि जवळच्या सहकाèयांमध्ये अढळ स्थान निर्माण केले होते.