मुंबई
maharashtra weather जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावत धुमाकूळ घातला होता. अवघ्या सहा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली होती. मात्र त्यानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता चिंतेत पडला आहे. दुसरीकडे पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून, आज देशातील १७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, काही भागांत पावसाचा मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या १७ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ८० ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
सावध रहा..
महाराष्ट्रालाही या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, कल्याण आणि भिवंडी परिसरात झालेल्या पावसामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाच्या हाहाकारात विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच पुण्यातही पावसामुळे मोठा परिणाम झाला होता. शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते, काही घरांमध्ये पाणी शिरले होते आणि ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
एकीकडे राज्यात maharashtra weather काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, दुसरीकडे आज महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, राज्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. आज राज्यात पावसाच्या विश्रांतीसह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र अनेक भागांत तापमान अधिक राहण्याची शक्यता असून, नागरिकांना उन्हाचे चटके जाणवणार आहेत.