पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
heavy rain राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असून, जुलै महिना अर्ध्यावर आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुढील किमान पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.
 

maharashtra weather update no heavy rain for next five days farmers worried over rainfall deficit 
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. लातूर, बीड, परभणी, यवतमाळ तसेच सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून, पावसाची तूट अद्याप कायम आहे. पुढील पाच दिवसांतही बहुतांश भागांमध्ये मान्सूनला अपेक्षित असा जोर मिळण्याची शक्यता नसल्याचे डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले.जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा परिसरात चांगला पाऊस झाला होता. मात्र, राज्यातील इतर भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या परिणामाचाही प्रभाव जाणवत असल्याचे चित्र आहे.
हवामानातील विविध प्रणाली heavy rain  कमकुवत झाल्यामुळे राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. घाटमाथ्यावर काही दिवसांपूर्वी 500 मिलिमीटरपर्यंत झालेला पाऊस आता थेट शून्यावर आला आहे. पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.गेल्या आठवडाभरात पुणे शहर, घाटमाथा आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून या भागात अचानक पावसाचा जोर कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी 500 ते 600 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. परंतु गेल्या 48 तासांत या भागातील बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद शून्यावर आली आहे.
 
 
ही परिस्थिती अनपेक्षित नसून, हवामानातील heavy rain  विविध प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी घाट परिसरातील अनेक भागांमध्ये सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाली होती.दरम्यान, पुढील महिन्यात देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, यंदा सरासरीच्या तुलनेत 10 टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेमुळे देशभर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत.