नागपूरकर उकाड्याने हैराण! पाऊस पुन्हा मुसळधार कधी बरसणार?

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर,
nagpur heavy rain भर पावसाळ्यातच पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भात उकाडा पुन्हा वाढला आहे. जुलैच्या सुरुवातीला दमदार पावसानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला व वातावरणात पुन्हा उष्णता आणि दमटपणा जाणवायला लागला. पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
 
 
nagpur weather
 
 
मात्र पुढच्या काही दिवसांत देशातील काही भागांत मुसळधार पाऊस तर अनेक ठिकाणी वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी देशभरात मान्सूनचा प्रभाव अद्याप तिकसाचा दिसून आलेला नाही. तसेच जुलै महिना अर्धा उलटत आला तरी अपेक्षित अशी पर्जन्यवृष्टी झालेली नाही. मात्र पुढच्या काही दिवसांत देशातील काही भागांत मुसळधार पाऊस तर अनेक ठिकाणी वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील १८ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात चांगला पाऊस पडू शकतो. त्यासोबतच बिहार, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून सध्या बंगालच्या उपसागरापासून उत्तर भारतापर्यंत सक्रीय आहे. त्यासोबत एकाच वेळी पश्चिमी विक्षोभ आणि एकाचवेळी अनेक चक्रिवादळांची स्थिती निर्माण झालेली आहे.nagpur heavy rain त्यामुळे येत्या २४ तासांत देशातील बहुतांश भागात पावसाची स्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांत वीज कोसळणे, वेगवान वारे वाहणे आणि पूरस्थिती निर्माण होणे अशा घटना घडू शकतात.