हिंगणघाट
rotary-club रोटरी क्लब हिंगणघाटचा सन २०२६-२७ या वर्षासाठीचा पदग्रहण समारंभ स्थानिक गिमाटेक्स ऑडिटोरियम येथे झाला. यावेळी संदीप डेहने यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तसेच नवीन कार्यकारिणीने पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
या सोहळ्याला पालकमंत्री पंकज भोयर, आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, सहप्रांतपाल मनोज मोहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
rotary-club ना. भोयर यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत रोटरीच्या निःस्वार्थ समाजसेवेचे कौतुक केले. आ. कुणावार यांनी रोटरीच्या समाजोपयोगी कार्याचा प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगून क्लबच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. नयना तुळसकर यांनी शहराच्या विकासासाठी रोटरीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष मंजुषा मुळे आणि शाकीरखान पठाण, सचिव-प्रशासन राम देशपांडे, सचिव-प्रकल्प उदय भोकरे, संयुक्त सचिव संजय काटपातळ व सीए धीरज मंडोत, कोषाध्यक्ष सीए सुमीत मोटवानी यांच्यासह जितेंद्र वर्मा, केदार जोगळेकर यांनी पदभार स्वीकारला.
rotary-club संचालन अशोक डालिया, सोनिया भट्टड, माया मिहानी यांनी केले तर उदय भोकरे यांनी आभार मानले.
यावेळी संजय काटपाताल यांना बेस्ट रोटेरियन ऑफ द इयर तर सोनिया भट्टड यांना बेस्ट न्यू रोटेरियन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले.