कंत्राटी गुरुजीकडून विद्यार्थ्यार्ंना अध्यायनाचे धडे

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
रपटा बनला मृत्युचा सापळा : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
पारवा, 
Parva Zilla Parishad Primary School पारवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षा दोन्ही वाèयावर आहे. तरी देखील पंचायत समिती शिक्षण विभागाकडून याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची ओरड पालकवर्गातून होत आहे. नियमांवर बोट ठेऊन काम करत असल्याचा ढोल पिटणाèया घाटंजी पंचायत समितीतील शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व केळापूर-आर्णी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाèया पारवा येथील जिप प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कंत्राटी शिक्षकांकडून अध्यायनाचे धडे दिल्या जात आहे. तर दुसरीकडे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे रपट्याला पडलेला भलामोठा खड्डा लहान मुलांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे.
 
 
rapata
 
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे चिमुकल्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाला लक्ष देण्याची वेळ नसल्याचा आरोप पालकवर्गातून होत आहे. शाळेत चार वर्ग असून, 40 विद्यार्थी व कारभार तात्पुरत्या शिक्षकाकडे सोपविण्यात आला आहे. जिप प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून 38 ते 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, येथील मूळ मुख्याध्यापिका शिक्षण सोडून निवडणूक आयोगाच्या नवीन मतदार नोंदणी व इतर अशैक्षणिक कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शाळेतील चारही वेगवेगळ्या वर्गांच्या चिमुकल्यांना सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ एका ‘पेसा’ कंत्राटी कर्मचाèयाच्या भरवशावर सोडण्यात आली आहे. एकाच खोलीत चारही वर्ग बसवून केवळ वेळ मारून नेली जात आहे. एकीकडे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे आदिवासी भागातील गरीब विद्यार्थ्यांचे होणारे हे शैक्षणिक नुकसान थांबवणार कोण? असा तिखट सवाल आता उपस्थित होत आहे.

बीडीओकडून निधी मिळाल्यास काम करु
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काम करायचे आहे. मात्र, गटविकास अधिकारी यांच्याकडून निधी आल्यास काम तत्काळ करु. तसेच माझ्या अधिकार क्षेत्रात जे शक्य होते, ते मी केले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
- प्रज्ञा पाटील
गटशिक्षणधिकारी