पोदार प्रेपमध्ये ‘मास्टरशेफ विथ डॅड’ उपक्रम उत्साहात

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Podar Prep School पोदार प्रेप, जगन्नाथ नगर येथे विद्यार्थी आणि त्यांच्या वडिलांसाठी ‘मास्टरशेफ विथ डॅड’ या आगळ्यावेगळ्या स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात लहानग्यांनी आपल्या वडिलांसमवेत पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या चवदार व पौष्टिक पाककृती सादर केल्या.

prep 
 
 
कार्यक्रमाला प्रसिद्ध शेफ अकलेश नांदुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाची संकल्पना स्वाती पोपट वस्त यांनी मांडली असून सेंटर हेड मोना सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य:सोनाली गलघाटे,संपर्क मित्र