वर्धा
slab-collapses आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील जीर्ण झालेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. घटनेच्या वेळी वर्गखोलीत कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
slab-collapses धनोडी (नांदपूर) येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोलीचा स्लॅबचा काही भाग ११ रोजी रात्रीच्या सुमारास कोसळला. या घटनेची माहिती मुख्याध्यापक रेखा हिवाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तर सरपंच कोमल कोल्हे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. विशेष म्हणजे जुनी इमारत धोक्याची असल्याने ती पाडून नवीन बांधण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, जिप व पंसच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले.
slab-collapses स्लॅब कोसळल्यानंतर नांदपूर येथील अरविंद लिल्लोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १३ जुलैला या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे.