‘येरे येरे पावसा..!’

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
(तालुका वार्तापत्र..)
तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना पावसाची प्रतीक्षा
- श्याम पांडे, 
 
दारव्हा :  
Rain: ‘Red Alert’ सध्या मोबाईलवर काही भागात ‘रेड अलर्ट’चे मेसेज, अतिवृष्टी होणार आहे तयार रहा, काळजी घ्या, असे मेसेज सुरू आहेत. मात्र विदर्भकर नागरिक पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत. गुरुवार, शुक्रवारी तर आकाशात ढग दाटून आले होते. मात्र पावसाचा थेंबही न पडला नाही. यावर्षी पाऊस हा सार्वत्रिक आणि सारखा अजिबात न पडल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत त्रस्त नागरिक बघायला मिळाले. इकडे तर नुसतं आभाळ येतंय पण कोसळत मात्र नाही, अशी काळजीयुक्त परिस्थिती तयार झाली.
 
 
paus
 
भारत कृषिप्रधान देश आहे. शेती हा आपल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. कमी पावसाने कोरडवाहू शेती करणाèया शेतकèयांची जास्त पंचाईत होईल. अपुèया आणि वेळेवर न आलेल्या पावसाळमुळे अन्नधान्य पिकणार नाही, पर्यायाने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. नदी, तलाव, विहिरी यामधील पाणीसाठा एकदम कमी होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. जनावरांसाठी चारा उत्पन्न होणार नाही आणि त्यांच्यासाठीसुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार हे निश्चित. अन्नधान्याचे उत्पादन घटून महागाईचा भडका उडणे हे अटळच. उष्णता वाढल्यामुळे पर्यावरणाचा समतोल हा ढासळतो आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न तयार होतात. पाऊस हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आतातरी वरुणराजाने कृपा करावी व सर्वांची चिंता मिटवावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.