रस्ते अपघातात घट : यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
यवतमाळ, 
Reduction in road accidents रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, परिवहन विभाग व संबंधित यंत्रणांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्रात उल्लेेखनीय यश संपादन केले आहे. रस्ते अपघातात घट घडवून आणण्यात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
 
 
acc dksl
 
रस्ता सुरक्षा अभियान, जनजागृती कार्यक्रम, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती तसेच वाहनचालकांमध्ये सुरक्षित वाहन चालनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच संबंधित विभागांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांनीही सहकार्य केल्याने अपघात नियंत्रणास मदत झाली. यवतमाळ जिल्ह्याच्या या यशाबद्दल राज्यस्तरावर कौतुक व्यक्त करण्यात येत असून जिल्ह्याची भविष्यातही रस्ते अपघातमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.
अशी होती आकडेवारी
जानेवारी ते जून 2025 या कालावधीत जिल्ह्यात 467 रस्ते अपघात झाले होते. त्यामध्ये 265 नागरिकांचा मृत्यु झाला होता. तर 326 जण जखमी झाले होते. याच कालावधीत 2026 मध्ये रस्ते अपघतांची संख्या 367 वर आली असून मृतांची संख्या 212 व जखमींची संख्या 229 इतकी झाली आहे.
पोलिस प्रशासनाने केले आवाहन
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे, अतिवेग व मद्यपान करुन वाहन चालविणे टाळावे, हेल्मेट व सीटबेल्ट नियमित वापर करण्याचे तसेच सुरक्षीत वाहतुकीसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.