विठ्ठलाच्या वारीत रिंकूचा खास व्हिडीओ शूट काय आहे कारण? VIDEO

रिंकूचा पहिला म्युझिक व्हिडीओ विठ्ठलाच्या चरणी

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
rinku rajguru पावसाळा सुरू झाला की वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध लागतात. यंदाची वारी आणखी खास करण्यासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीमधील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून रिंकूचा भक्तिमय अंदाज लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 

rinku rajguru 
 
 
 
सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकू राजगुरू एका नव्या रूपात दिसणार आहे. सारेगम मराठीने सोशल मीडियावर या गाण्याची छोटी झलक शेअर केली असून, त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या गाण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बाप विठुराया’ असे या गाण्याचे नाव असून, प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या दमदार आवाजातून हे भक्तिगीत साकारले जाणार आहे. अजय यांच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा या गाण्याच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.
 
 
 
                                                                            सौजन्य सोशल मीडिया  
या गाण्याबाबत भावना व्यक्त करताना रिंकू राजगुरू म्हणाली की, तिचे पहिले अल्बम गाणे विठ्ठलावर आधारित असल्याचा तिला खूप आनंद आहे. विठ्ठलाशी तिचे नाते खूप जुने असून, त्याच्यावर तिची प्रचंड श्रद्धा आणि प्रेम आहे. विठ्ठल हा तिच्या आयुष्यातील एक हळवा भाग असल्याचेही तिने सांगितले. तिच्या प्रत्येक गोष्टीत विठ्ठल सोबत असल्याची भावना असून, ती त्याच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारते, असे रिंकूने नमूद केले.‘बाप विठुराया’ हे गाणे करताना विठ्ठलाच्या इच्छेनेच हे सर्व जुळून आल्यासारखे वाटले, असेही रिंकूने सांगितले. आजवर तिने कोणतेही अल्बम सॉंग केले नव्हते, कारण तिची काम करण्याची पद्धत वेगळी असल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र, हे गाणे तिच्यासाठी विशेष असल्याचे तिने सांगितले.या गाण्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर अजय गोगावले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही रिंकूने व्यक्त केला. तसेच, सारेगमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दलही तिने समाधान व्यक्त केले. तिचे पहिले अल्बम सॉंग असल्याने ‘बाप विठुराया’ हे गाणे तिच्यासाठी खूप खास आणि मनाजवळचे असल्याचे रिंकूने सांगितले. हे गाणे प्रेक्षकांनाही तितकेच आवडेल, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे.