रशिया-इराणचा ‘क्रिप्टो’मध्ये व्यापार

९.९२ लाख कोटींचे व्यवहार; वेगळे नेटवर्क केले तयार

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |

 

मॉस्को
russia-iran रशिया, इराण आणि उत्तर कोरियाने जगाच्या बँकिंग व्यवस्थेपासून वेगळी, क्रिप्टोच्या माध्यमातून एक समांतर पेमेंट प्रणाली उभी केली आहे. क्रिप्टो व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या चेनालिसिस संस्थेनुसार, २०२५ मध्ये त्यांनी क्रिप्टोद्वारे तब्बल ९.९२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. हे २०२४ च्या तुलनेत आठपट जास्त आहे. हे देश या रकमेचा वापर केवळ व्यापार किंवा बचतीसाठी करत नाहीत, तर ड्रोन, शस्त्रास्त्रांचे सुटे भाग, लष्करी तंत्रज्ञान आणि तेलाच्या पेमेंटसाठी करीत आहेत.
 
russia iran
 
 

russia-iran  रशियाने रुबलशी संबंधित ए-७५ टोकन तयार केले. यात रशियामध्ये रुबल देऊन परदेशात क्रिप्टोमध्ये बदलता येते. मे महिन्यापर्यंत यात ११.४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. नेटवर्कमध्ये ४१ हजारांपेक्षा जास्त खाती आणि २.५ लाख हस्तांतरणे नोंदवली गेली. इराणने देशांतर्गत एक्सचेंजेसना तेल विक्री आणि परदेशी देयकांसाठी पर्यायी मार्ग बनवले आहे. रिव्होल्युशनरी गार्ड क्रिप्टोमधून तेलाचे पैसे घेतात आणि ते डिजिटल वॉलेटमध्ये इतर देशांमध्ये पाठवतात. विशेषज्ञ क्रिप्टोला रशिया-इराणसाठी निर्बंधांच्या समांतर चालणारी एक स्थायी आर्थिक व्यवस्था मानत आहेत.

 
russia-iran  उत्तर कोरियाने क्रिप्टो चोरीला कमाई आणि शस्त्र कार्यक्रमाचे साधन बनवले आहे. २०२५ मध्ये त्याच्या हॅकर्सनी २० हजार कोटी रुपये चोरले. सर्वांत मोठी घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली. यात लाझारस समूहाने बायबिटमधून १४,३१० कोटी रुपये उडवले. एफबीआयने याला ‘ट्रेडरेटर’ नेटवर्कशी जोडले. २०१६ पासून उत्तर कोरियाने २६३ घटनांमध्ये ६.७५ अब्ज डॉलर्सची क्रिप्टो चोरी केली आहे. याचा वापर तो क्षेपणास्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी करत आहे.
इराणचे सर्वांत मोठे क्रिप्टो एक्सचेंज नोबाइटेक्स. देशातील सुमारे ७० टक्के डिजिटल चलन व्यवहार सांभाळते आणि त्याचे १.१ कोटी वापरकर्ते आहेत. चीनशी संबंधित मनी-लॉण्ड्रिंग नेटवर्क आता ‘लाॅण्ड्रिंग-एज-ए-सर्व्हिस’ मॉडेलवर काम करीत आहेत. चेनालिसिसनुसार, चिनी नेटवर्क दररोज ४२०० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढऱ्यात रूपांतरित करत आहेत. २०२५ मध्ये त्यांनी १.५३ लाख कोटी रुपये पांढऱ्या पैशांमध्ये बदलले. हे नेटवर्क प्रतिबंधित देशांचे पेमेंट आणि दहशतवादी फंडिंगची रक्कम एकाच वेळी प्रोसेस करतात.


क्रिप्टो कंपन्यांमध्ये बनावट नोकऱ्या

russia-iran  बनावट ओळख, एआयने तयार केलेली कागदपत्रे आणि डीपफेक मुलाखतींद्वारे चीन, उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांतील ऑपरेटिव्हजनी ४० देशांतील क्रिप्टो आणि तांत्रिक कंपन्यांमध्ये रिमोट नोकऱ्या मिळवल्या. या नेटवर्कने दोन वर्षांत २६,७०० कोटी रुपये जमा केले. अनेक प्रकरणांमध्ये कर्मचारी त्याच देशात काम करीत असल्याचे दिसावे म्हणून स्थानिक मदतनीसांनी ‘फर्म’ चालविल्याचे निष्पन्न झाले.