आर्वी
bahujan-activists महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने बहुजन कार्यकत्र्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, कार्य समितीचे सदस्य चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते आमदार मा. विजय वडेंटीवार यांचे हस्ते केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून म. रा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ होते.
bahujan-activists बहुजन समाजाने महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांची सांगड घालून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले.
आ. वडेट्टीवार यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई हे अत्यंत ज्वलंत प्रश्न असून जनतेच्या हितासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
bahujan-activistsयावेळी चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे महासचिव व शिदोरी मासिकाचे संपादक अनंत मोहोड यांनी केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कान्हेरे, भानुदास माळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल कोल्हे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
bahujan-activists संचालन आशिष खंडागळे यांनी केले तर आभार चंद्रशेखर जोरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून १६ बलुतेदार व समाजसेवकांचा सत्कार व जनमानसाची शिदोरी या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.