पिंपळगावात वाघाने केली तीन जनावरं जखमी

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर, 
tiger-injures-animals : पिंपळगाव शिवारात तीन महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा मुक्त संचार आहे. रविवार १२ रोजी वाघाच्या हल्ल्यात तीन पाळीव जनावरे जखमी झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्यांना निवेदन देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
 
 
 
jk
 
 
 
निवेदनात नमूद केल्यानुसार, १२ रोजी विनायक नायसे यांचे बैलं व गायीवर वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले. शेतात कामं करताना तसेच जनावरं चारण्यासाठी नेताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे वाघाचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. वाघाच्या हालचालींवर वन विभागाचे सातत्याने लक्ष आहे. संबंधित भागात वन कर्मचार्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून वाघाच्या वास्तव्याच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे यांनी सांगितले.