दोन शिक्षक अन् सात वर्ग; शाळेलाच ठोकले कुलूप

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
देवळी
students protest शिक्षक द्या, नाहीतर शाळा बंद करा अशी हाक देत तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील जिप उच्च प्राथमिक शाळेला आज सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी गावकर्यांनी कुलूप ठोकले. तब्बल ७५ विद्याथ्र्यांसाठी केवळ दोन शिक्षक आणि त्यापैकी एकावर बीएलओची जबाबदारी असल्याने संतप्त पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
 
wardha photo
 
students protest पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्याथ्र्यांची जबाबदारी केवळ दोन शिक्षकांवर असल्याने अध्यापन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातही एका शिक्षकाला बीएलओच्या कामासाठी वारंवार बाहेर जावे लागत असल्याने अनेकदा संपूर्ण शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर चालते. याकडे लक्ष वेधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकार्यांना निवेदन देऊन विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब नमुद केली होती. यानंतर २ महिन्याने सेवानिवृत्त होणार असलेल्या शिक्षकाची नियुक्ती केली. पण, त्या नियुक्तीला विरोध करत कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
students protest  आंदोलनादरम्यान पालकांनी शिक्षक देऊ शकत नसाल तर आमच्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले द्या आणि ही शाळा कायमची बंद करा अशी संतप्त भूमिका घेतली. ७५ विद्याथ्र्यांमागे फक्त दोन शिक्षक आणि त्यापैकी एक शिक्षक इतर शासकीय कामात गुंतलेला असेल तर विद्याथ्र्यांचे शिक्षण कसे होणार? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पारडे, केंद्रप्रमुख दिलीप देशमुख यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून आठ दिवसांत दोन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप उघडले.
students protest  आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीच्या आयशा वाघमारे, नीरज कोंबे, नितीन फुके, दुर्योधन वैद्य, वैशाली काचोळे, अरुणा शेंद्रे, प्रियंका आडकीने, संदीप बेंडे, नारायण राऊत, शरद कांबळे, मोरेश्वर वानखेडे, सुभाष व्यवहारे, भूपेंद्र होरे, संतोष भोयर, विपुल राघाटाटे, प्रवीण कात्रे, प्रवीण खाडे, भरत फटिंग आदी सहभागी झाले होते.