ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्या पत्नीचे निधन

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
मुंबई
sunila sharma मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज आणि सदाबहार संगीतकार जोडी 'लक्ष्मीकांत–प्यारेलाल'मधील ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे निधन झाले आहे. १२ जुलै २०२६ रोजी त्यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून, कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
 

veteran composer pyarelal wife sunila sharma passes away at 78 
बॉलिवूड गायिका प्रियांका मित्रा यांनीही कुटुंबाचे अधिकृत निवेदन सोशल मीडियावर शेअर केले आहे. या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीत क्षेत्रासह संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “अत्यंत दुःखाने आम्ही आमच्या प्रिय ‘अम्मा’ अर्थात सुनीला प्यारेलाल शर्मा यांच्या निधनाची घोषणा करत आहोत. १२ जुलै २०२६ रोजी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांचे संपूर्ण आयुष्य शांततेने आणि समाधानाने परिपूर्ण होते.”सुनीला प्यारेलाल शर्मा या आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या, असेही कुटुंबीयांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. “आज त्यांच्या जाण्याने आमची मने दुःखाने भरून आली असली, तरी त्या आता शांत आहेत, ही जाणीव आम्हाला दिलासा देणारी आहे,” अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या दुःखद प्रसंगी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, अभिनेते, गायक तसेच नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही शोकभावनांचा पूर आला असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.