पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी भडकणार?

अमेरिका- इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने तज्ज्ञांचा इशारा

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |

 

दुबई

petrol-diesel price अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या संघर्षामुळे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहेत. संघर्ष कायम राहिला तर हे भाव प्रति बॅरल ११० ते १५० डॉलर्सपर्यंत वाढू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या वाढीचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांवर होणार आहे.


petrol price 
 
petrol-diesel price सोमवारी तेलाच्या दरात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळल्यामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. १३ जुलै रोजी 'ब्रेंट क्रूड फ्युचर्स'चे भाव ३.३४ डॉलर्सनी (४.३८%) वाढून प्रति बॅरल ७९.५० डॉलर्सवर पोहोचले, तर अमेरिकेच्या 'डब्ल्यूटीआय' कच्च्या तेलाचे भाव ३.०७ डॉलर्सनी वाढून प्रति बॅरल ७४.२० डॉलर्स झाले आहेत. मागील आठवड्यात ५.५ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर ही नवीन दरवाढ झाली आहे; यात 'डब्ल्यूटीआय'चे भाव पुन्हा एकदा प्रति बॅरल ७४ डॉलर्सच्या वर गेले आहेत. रविवारच्या सुट्टीनंतर आज (दि. १३ जुलै) बाजार उघडताच युरोपियन नैसर्गिक वायूच्या फ्युचर्समध्येही २.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असल्याने बाजारातील आर्थिक तणाव वाढल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
 

petrol-diesel price अलीकडील तणावामुळे वर्षाच्या अखेरीस जागतिक तेलाचा साठा पुन्हा भरून काढण्याच्या प्रयत्नांना धोका निर्माण झाला आहे, असे निरीक्षण आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात नोंदवले होते. एका जहाजावरील हल्ल्यानंतर इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केल्याचे जाहीर केले असले तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की, व्यापारी वाहतुकीसाठी हामार्ग खुला आहे.

उत्पादनातील घट कायम
petrol-diesel price या ताज्या घडामोडींमुळे गेल्या महिन्यात स्वाक्षरी केलेल्या त्या तात्पुरत्या कराराच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; ज्याचा उद्देश पुढील ६० दिवसांच्या वाटाघाटींनंतर संघर्ष सोडवणे हा होता. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (आयईए) मासिक अहवालानुसार, करारानंतर जूनमध्ये जागतिक तेल पुरवठ्यात दररोज ४.१ दशलक्ष बॅरल्सची वाढ झाली; तरीही, उत्पादन हे युद्धापूर्वीच्या पातळीपेक्षा दररोज ९.४ दशलक्ष बॅरल्सने कमीच राहिले. बाजारातील तणाव कायम असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.


कच्च्या तेलाचा प्रवाह खंडित होण्याची शक्यता

petrol-diesel price 'नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज'च्या मते, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' दीर्घकाळासाठी बंद राहिली तर दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल्स कच्च्या तेलाचा प्रवाह खंडित होऊ शकतो. तेलाच्या किमती प्रति बॅरल ११० ते १५० डॉलर्सच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'एसईबी'च्या मुख्य कमोडिटी विश्लेषकाच्या मते, बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, प्रति बॅरल ७० डॉलर्सऐवजी ८० डॉलर्स ही किंमत अधिक योग्य ठरेल.