कुरखेडा
worlds-top-5-scientists- सध्या म्हैसूर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था येथे कार्यरत असलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश एम. हलामी यांची ओपनप्लेक्स डेटाबेस-2025 च्या साय-रँक ग्लोबल रजिस्ट्रीमध्ये जगातील पाच टक्के सर्वोत्तम शास्त्रज्ञांमध्ये निवड झाली आहे. जागतिक स्तरावर निवड झालेले ते जिल्ह्यातील पहिलेच संशोधक ठरले आहेत.
worlds-top-5-scientists- साय-रँक ग्लोबल इंडेक्स एक वार्षिक डेटा आधारित मानांकन आणि प्रमाणन प्रणाली असून जी ग्रंथमापन डेटा वापरून दरवर्षी जगातील सक्रिय संशोधकाचे मूल्यांकन करते. हे मानांकन वार्षिक डेटा स्नॅपशॉटमधून तयार केले जाते. याद्वारे असे निदर्शनास आले की, जगभरातील सुमारे 12 कोटी संशोधकांपैकी केवळ एक कोटी सक्रिय संशोधक आहेत. भारतामध्ये एक मोठा वैज्ञानिक समूह आहे तसेच बरेच संशोधन संस्था व विद्यापीठे देखील आहेत. मात्र, विकसनशील देशाच्या तुलनेत येथील संशोधकांच्या एकूण प्रोफाईलचे प्रमाण केवळ 2 टक्केच आहे.
worlds-top-5-scientists- डॉ. प्रकाश हलामी यांना तीन दशकांहून अधिक संशोधन क्षेत्राचा अनुभव असून जगातील शीर्षस्थानी असलेल्या संशोधकांपैकी एक म्हणून त्यांच्या वैज्ञानिक योगदानाला मान्यता मिळाली आहे. हा बहुमान त्यांच्या व्यापक मेटाडेटाच्या आधारे देण्यात आला, ज्यामध्ये लाखो संशोधक, प्रकाशने, संस्था, संशोधन विषय यांचा तुलनात्मक आणि सखोल अभ्यास केला गेला आणि त्यामुळे सर्व शैक्षणिक शाखांमधील संशोधनाचा व्यापक आणि पारदर्शक आढावा घेणे शक्य झाले.
worlds-top-5-scientists- डॉ. प्रकाश हलामी यांनी त्यांच्या संशोधन कार्यात फायटीक आम्ल, शरीरातील पेशी, साखरयुक्त सेंद्रिय पदार्थ, समुद्रातील तण यांसारख्या पदार्थांवर सूक्ष्मजीवांच्या वापरसंबंधातील मोठे योगदान आहे. तसेच आण्विक जीवशास्त्र, प्रोबायोटिक, कार्यात्मक अन्न, अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य त्याचप्रमाणे जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी बीफिडो-कर्ड, प्रोबायोटिक गाजर नेक्टर, बीफिडोबॅक्टेरिया समृद्ध सोया कर्ड ही तीन तंत्रज्ञान विकसित करून हस्तांतरित केले आहे. तसेच संगणकीय अभ्यासासाठी एक लक्टोबॅसिलासी एक्सप्लोरर सॉफ्टवेअर देखील त्यांनी विकसित केले.