समृद्धीवर अपघात, एक जखमी

४ लाखांचे नुकसान, ट्रेलर चालकास अटक

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
वर्धा
accident-on-samruddhi मद्यधूंद अवस्थेत समृद्धी महामार्गावरून ट्रेलर भरधाव नेत असतानाच अचानक ट्रेलरमधून लोखंडी अँगल रस्त्यावर पडला आणि मागून येणार्‍या चारचाकीचा अपघात झाला. यात चारचाकीमधील एक जण जखमी झाला. ही घटना १३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली. याप्रकरणी ट्रेलर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अर्जुन कुमार (२४) रा. बिहार असे अटक केलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे.
 
accident
 
accident-on-samruddhi  मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील शेख अबरार शेख इमरोव (३०) हे मित्रासह एम. एच. १० डी. जी. ६९४६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नागपूरहून मुंबईकडे समृद्धी महामार्गाने जात होते. रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनासमोर एन. एल. ओ. १ एल. ५६५३ क्रमांकाचा ट्रेलर होता. मात्र, ट्रेलर चालक हा इतरांना इजा होईल अशा पद्धतीने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, ट्रेलरमधून लोखंडी अँगल रस्त्यावर पडल्याने शेख अबरार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला.
 
accident-on-samruddhi  या अपघातात अबरार यांचा मित्र जखमी झाला. जखमीला तात्काळ शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. तसेच ट्रेलरचा तब्बल १० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पकडण्यात आले. ट्रेलरचा चालक हा मद्यधूंद अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रेलर चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कार चालक शेख अबरार शेख इमरोव यांचे जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले.