‘त्या’ सभागृहाला पं. दीनदयाल उपाध्याय नाव द्या

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
राज्यपाल नामित सिनेट सदस्यांची मागणी
विद्यापीठात होत आहे बहुउद्देशीय सभागृह
 
अमरावती, 
Amravati University विद्यापीठात साकार होत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ असे नाव देण्याची मागणी राज्यपाल नामित अधिसभा (सिनेट) सदस्यांनी कुलगुरू डाॅ. मिलिंद बारहाते यांच्याकडे मंगळवारी लेखी निवेदन देऊन केली.
 
 
amt ds
अमरावती विद्यापीठाच्या विस्तीरण परिसरातच हे बहुउद्देशीय सभागृह आकाराला येत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय हे थोर राष्ट्रचिंतक, तत्त्वज्ञ, समाजसेवक व ‘एकात्म मानववाद’ या विचारधारेचे प्रणेते होते. त्यांनी राष्ट्रहित, सामाजिक समरसता, अंत्योदय आणि मूल्याधिष्ठित विकासाचा पुरस्कार केला. त्यांचे विचार आजही शिक्षण, समाजजीवन आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणादायी आहेत. विद्यापीठात तयार होणारे नवे सभागृह हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक आहे. अशा सभागृहास पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव दिल्यास विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा मिळेल. तसेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव होईल. विद्यापीठ प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रस्तावित सभागृहाचे नामकरण 'पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह' असे करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सिनेट सदस्य राजेंद्र पाण्डे, श्रीकांत काळीकर, डाॅ. श्याम मुंजे, आशिष सावजी, सुनील तिप्पट, गिरीश शेरेकर, अमोल ठाकरे, अमित देशमुख, पल्लवी कुळकर्णी उपस्थित होत्या. कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.