आर्वी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. कोडवानी

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.)
bar-association आर्वी येथील आर्वी बार असोसिएशन सन २०२६-२७ च्या कार्यकारी मंडळाची निवडणूक सोमवार १३ रोजी पार पडली. यात अध्यक्षपदी अ‍ॅड. हरीश कोडवानी यांची वर्णी लागली असून उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद देशमुख तसेच कोषाध्यक्ष आणि ग्रंथपाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
bar
 
bar-association सचिव पदासाठी मंगेश करडे व गणराज चव्हाण यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. परंतु, दोघांनाही सारखी मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. ईश्वरचिठ्ठीने सचिव पदासाठी मंगेश करडे विजयी झाले. सहसचिवपदी गजेंद्र भुयार, कोषाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. अलका काळे, ग्रंथपाल म्हणून अ‍ॅड. प्रशांत डाप विजयी झाले.
 
 
bar-association निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. एन. एम. पुजारी तर सहाय्यक म्हणून डी. जे. माखिजा यांनी काम पाहिले. यावेळी बार असोसिएशनचे अ‍ॅड. आर. एस. धारस्कर, अ‍ॅड. व्ही. टी. देशपांडे, अ‍ॅड. अरुणा देशपांडे, अ‍ॅड. गुरुना सिंघानी, एम. एल. गहलोत, अ‍ॅड. श्रद्धा धारस्कर, अ‍ॅड. आर. के. गुरुनासिंघानी, अ‍ॅड. खोब्रागडे, अ‍ॅड. राठी, अ‍ॅड. आरती तवर, अ‍ॅड. अविनाश चौधरी आदी उपस्थित होते.