बूस्टर’ कंपनीवर देवळीत गुन्हा दाखल

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
सोयाबीनचे १७ नमुने ‘फेल’
देवळी ठाण्यात गुन्हा दाखल
 
वर्धा, 
Bogus seed case खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली. मात्र, अनेक नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण झाली नाही. या न उगवल्या बियान्यांमध्ये बुस्टर नामक कंपन्यांची बियाने मोठ्या प्रमाणात होती. या प्रकरणी शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाच्या तांत्रिक तपासणीत ‘बुस्टर’ बियाने नापास झाले. या प्रकरणी देवळी येथील कृषी विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी बुस्टर कंपनीवर गुन्हा दाखल केला.


soy a dksl 
 
यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पावसाने आराम केला. त्यानंतर शेतकर्‍यांना दिलासा दिला. शेतकर्‍यांनी कर्जबाजारी होऊन उन्हाळ्यातच बी बियाणे खतांची तयारी करून ठेवली होती. पाऊस येताच पेरणीही केली. परंतु, देवळी, सेलू तालयात काही शेतकर्‍यांच्या शेतात सोयाबिन उगवलेच नाही. ते बियाणे बहुतांश बुस्टर या कंपनीचे होते. बियाने उगवले नसल्याने शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणी करण्याचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात बूस्टर प्लांट जेनेटिस प्रा. लि. या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या विरोधात ३०५ तक्रारी आहेत. यात सर्वाधिक तक्रारी देवळी तालुयात दाखल झाल्या आहेत. या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांचे १७ नमुने तपासणीत नापास झाले असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत देवळी पं.स.चे बीज निरीक्षक तथा कृषी अधिकारी युवराज जंगले यांच्या तक्रारीवरून जालना येथील कंपनीचे संचालक राहुल पुरमे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या चौकशी दरम्यान जिल्हाभरातील बूस्टर कंपनीच्या १७ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळा चाचणीत नापास ठरल्याचे समोर आले आहे. कमी उगवण क्षमता आणि निकृष्ट गुणवत्तेमुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महागड्या दराने ब्रँडेड बियाणे खरेदी करूनही पीक उगवले नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. आधीच अनियमित पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना निकृष्ट बियाण्यांमुळे त्यांच्या संकटात अधिकची भर पडली आहे.
देवळी तालुयात तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याने कंपनीविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तर संबंधित कंपनीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया कृषी विकास अधिकारी शिवा जाधव यांनी दिली.
सर्व तक्रारींचे निवारण करणार
संबंधित कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र पाठवून शेतकर्‍यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. शेतकर्‍यांना बियाण्यांच्या पिशव्यांची योग्य किंमत डीलरमार्फत परत करण्यात येईल तसेच १० जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
 
कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा
कृषी विभागाकडे आतापर्यंत जिल्हाभरातून ३०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यापैकी १८१ तक्रारी एकट्या देवळी तालुयातील आहेत. इतर तालुयांतूनही सातत्याने तक्रारी येत आहेत. विभागीय अधिकारी शेतकर्‍यांच्या शेतांची पाहणी करून पिकांची स्थिती तपासत असून संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. आतापर्यंत प्राप्त तक्रारींमध्ये बूस्टर कंपनीच्या १८६, महाबीजच्या २१, इनोव्हेजच्या १५, यशोदा कंपनीच्या २५, रवी सीड्सच्या १३ तसेच इतर कंपन्यांच्या बियाण्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश आहे. कृषी विभागाने यापैकी १५६ तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण करून संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस बजावत पुढील कारवाई सुरू केली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.