कॉमेडियन समय रैनाला तीन लाखांचा दंड

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
samay-raina सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
samay raina
 

samay-raina न्यायालयाने दिव्यांगांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात हा आदेश दिला आहे. याची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने केली. आमच्या आदेशानंतरही रैनाने आपल्या शोमध्ये कोणत्याही दिव्यांगाला बोलावले नाही, असे खंडपीठाने म्हटले. न्यायालय क्युअर एसएमए इंडिया फाउंडेशनच्या याचिकेवर सुनावणी करत होते, ज्यात रैनाच्या शोमध्ये स्पाइनल मस्कुलर ॲट्रोफीच्या उपचाराच्या खर्चावर असंवेदनशील टिप्पणी केल्याचा आणि दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. रैनाने त्याच्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी किंवा इतर कोणत्याही दिव्यांग व्यक्तीशी कधीही संपर्क साधला नाही, असे संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दंड ठोठावला.

 
samay-raina याचिकेत दिव्यांगांच्या जीवन आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन सामग्रीच्या प्रसारणावर नियम बनवण्याची मागणी केली आहे. ही याचिका नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आली. २०२५ मध्ये न्यायालयाने रैना आणि इतर स्टँडअप कॉमेडियन्सना दिव्यांगांच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी दरमहा दोन कार्यक्रम करण्याचे निर्देश दिले होते. कार्यक्रमामध्ये दिव्यांगांनाही सहभागी होण्यासाठी राजी करावे, असे म्हटले होते.