हिंगणघाटात जिल्हा साहित्य संमेलन; शाखेचे उद्घाटन

    दिनांक :14-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट
literary-meet  विदर्भ साहित्य संघ हिंगणघाट शाखेचे उद्घाटन तसेच वर्धा जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार १९ रोजी करण्यात आले आहे. स्व. प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे स्मृती व्यासपीठावर होणार्‍या या संमेलनाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, नागपूर शाखा हिंगणघाट यांच्या वतीने स्थानिक माता मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

sahitya 
 
 
literary-meet उद्घाटन सकाळी १०.३० होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. राजेंद्र मुंडे राहतील तर उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर आहेत. यावेळी आ. समीर कुणावार, अ‍ॅड. सुधीर कोठारी, अतुल वांदिले, डॉ. प्रा. उषा थुटे आदी उपस्थित राहतील. दुपारी १२ ते २ या वेळेत कवी संमेलन होईल. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी संजय इंगळे तिगावकर राहतील.
 
literary-meetयावेळी भद्रावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, बल्लारशाह, नांदेड, आर्वी, वरोरा, सिंदी (रेल्वे) येथील २० हून अधिक नामवंत कवी-कवयित्री येथे आपल्या रचना सादर करतील. दुपारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता संमेलनाचा समारोप काव्यमैफिलीने होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर मुटे राहतील. विदर्भातील ३० हून अधिक मान्यवर कवी-कवयित्री आपले काव्य सादर करतील. विशेष म्हणजे, इच्छुक स्थानिक कवींनाही पूर्वसूचनेने काव्यवाचनाची संधी दिली जाणार असून त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त साहित्यिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.