तभा वृत्तसेवा
मुंबईladki-bahin-scheme ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला बदनाम करण्यासाठी आणि ही योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि उबाठा गटानेच मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मविआच्या कॅम्पमधून जाणीवपूर्वक लाखो बोगस लाभार्थी या योजनेत घुसवण्याचे पाप उबाठाने केल्यानेच ९३ लाख बोगस लाभार्थी सापडल्याचा ठपका नवनाथ बन यांनी ठेवला.
ladki-bahin-scheme लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी पैसे लाटल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने या बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची नवनाथ बन यांनी अक्षरशः पिसे काढली. मविआमध्ये असताना उबाठाने या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावले होते. या योजनेला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी उबाठाच्या माध्यमातून आणि मविआच्या याच कॅम्पमधून सर्वाधिक बोगस लाभार्थी घुसवले गेले, ज्यातून तब्बल ९३ लाख बोगस लाभार्थी समोर आले आहेत.आता संजय राऊत उच्च न्यायालयात जाण्याची धमकी देऊन ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राऊतांनी कितीही आदळआपट केली तरी ही योजना बदलणार नाही आणि बंदही पडणार नाही. उलट, बोगस लाभार्थी घुसवून कट रचणाऱ्या उबाठाला राज्याच्या सच्च्या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाहीत आणि आगामी निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील, असा इशारा नवनाथ बन यांनी दिला.
ladki-bahin-scheme जनाब राऊत, तुम्ही आता 'संपत राऊत' झाला आहात!राऊतांवर प्रहार करताना बन पुढे म्हणाले की, उबाठा गट आता पूर्णपणे अडगळीत पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वात भाजपची वाटचाल अतिशय सुरळीत सुरू आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर्व निर्णय घेण्यास अतिशय सक्षम आहेत. त्यामुळे राऊतांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय चाललेय, याचे संशोधन करण्यापेक्षा स्वतःच्या बुडत्या जहाजाकडे लक्ष द्यावे.